आयुष्याचा आधार
जाँन आगियार
ती आज कुठे असतील?
मातीची घरे.
ते आज कुठे आहे?
शेणाने सारवलेले अंगण.
आज शेणाच्या गोवर्या
झाल्या दुमींंळ
फांदीवर बसून गाणी गाणारे
पक्षीही झाले दिसेनासे
ताडी काडणारे रेदेर
आज गायब झाले
नारळ तोडणारे पाडेली
हरवले ते ही कुठल्या कुठे
शेते भाटे दिसत नाही अवतीभवती
आपणच शोघत आहोत स्व:ताला
आज खरें तर आपणच
हरवत चाललो आहोत
नव्या ओळखीचा जो
उफाळून आला उमाळा
माणसानेच उपटून टाकला
आयुष्याचा सनातन आधार
No comments:
Post a Comment