Sunday, February 1, 2026

उलो

 उलो


जॉन आगियार


खंय शेणलो 'गोंयकार', सोदूनय आता मेळना,

परक्यांच्या ह्या गर्दींत, खरी काणी कोणाक कळना.


खंयचेखंय थुंकून  करतात घाण,फुलोवन छाती,

शांत सुंदर ह्या भुंयेची, कशी जाली ही माती?


दोंगर खणले, झाडां मारलीं, सिमेंटचें जालें रान,

खाजनां सगळीं गिळलीं तांणी, निसर्गाचो गेलो मान.


उदक ना, वीज ना, प्रदूषणाचो सुटला वास,

मेगा सिटीच्या नांवान, थळांव्याच्या गळ्याक फांस.


शांतताय सगळी काबार जाली, सुखाची पेटली होळी,

नव्या प्रकल्पांच्या जाळ्यांत, आडकली आमची झोळी.


हे शांतादुर्गा माते, काली जावन हांचे रगत पी

शेणिल्लें तें सूख-समाधान, ते गोंय, आमकां परत दी.


तुझ्या चरणी एकच मागणें, उकल‌ तूजो भालो

शांततायेच्या ह्या नंदनवनाचो, आयक एकदां उलो.





माझा गोवा, माझी व्यथा


जॉन आगियार


कुठे हरवला 'गोमंतकीय', शोधूनही मिळेना आता,

परप्रांतीयांच्या गर्दीत हरवली, इथली खरी कथा.


कुठेही थुंकून घाण करतात, शिस्त ना कसली भिती,

शांत सुंदर या भूमीची, अशी कशी झाली स्थिती?


डोंगर पोखरले, झाडे तोडली, सिमेंटचे झाले रान,

पाणथळ जमिनी गिळल्या साऱ्या, निसर्गाचा गेला मान.


पाणी नाही, वीज नाही, प्रदूषणाने कोंडला श्वास,

मेगा सिटींच्या नावाखाली, स्थानिकांना फक्त त्रास.


शांततेचा भंग झाला, सुख-शांतीची झाली होळी,

नव्या प्रकल्पांच्या वेढ्यात, अडकली आमची झोळी.


हे शांतादुर्गा माते, जुना गोवा परत दे,

हरवलेले ते सुख-समाधान, पुन्हा येउ दे.


नासवले ज्यांनी घर आमचे, त्यांना तूच दे दंड,

रक्षण कर  या अबोल भूमीचे, मोड त्यांचे हे पाखंड.


तुझ्या चरणी एकच मागणी, गोवा आमचा राख,

शांततेच्या या नंदनवनाची, ऐक एकदा हाक.